Home मराठी महाराष्ट्राच्या सिमेवरील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही:मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्राच्या सिमेवरील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही:मुख्यमंत्री शिंदे

368

सहकुंटुंब घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही. त्या भागातील बहुतांश प्रश्न, समस्या सोडविण्यात आल्या आहेत. प्रलंबीत समस्या युध्दपातळीवर सोडवून सीमावादाचा प्रश्न सामोपचाराने सोडवावा, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली. यावेळी श्री साईबाबा संस्थान तदर्थ समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, विजय जगताप आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

सीमेवरील नागरिकांच्या समस्या दोन्ही राज्य सामोपचाराने सोडवणार याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, विजय जगताप आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साईंची पाद्यपूजा करण्यात आली.

साईदर्शनानंतर ते म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक या राज्यांत समाविष्ट करण्याची मागणी २०१२ ची आहे. त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती. तेथे आता पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी बऱ्याचशा योजना केल्या आहे. जलउपसा तसेच जलसिंचन प्रकल्प असे अनेक प्रकल्प मार्गी लावत आहोत. पाण्यासाठी कुठलीही गावे इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही, याची जबाबदारी आमची आहे.

सीमेवरील त्या भागातील समस्या, प्रश्न सोडविण्यात आले आहे. तर काही प्रलंबित असून त्या युद्धपातळीवर सोडवल्या जातील. कोणावरही अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकारची आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जुना असून न्यायालयात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु हा विषय सामोपचाराने सोडविण्याची आमची भूमिका आहे. मध्यंतरी दोन्ही राज्यपालांच्या बैठक्या झाल्या आहे.

यामध्ये केंद्र सरकार देखील सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गुवाहटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार सीमा भागातील मराठी माणसांसाठी काही योजना, लाभ यामध्ये नव्याने वाढ केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करून ती २० हजारापर्यंत केली. मराठी माणसांना राज्य शासनाच्या वतीने काय सुविधा देता येतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Previous article#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो
Next article108 व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ च्या कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).