Home Congress राहुल गांधींची पळण्याची शर्यत:विद्यार्थी व कार्यकर्त्यांसोबत धावले

राहुल गांधींची पळण्याची शर्यत:विद्यार्थी व कार्यकर्त्यांसोबत धावले

512

भारत जोडो यात्रेत भरला उत्साह; 1300 किमीहून अधिक अंतर पार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आता तेलंगणात पोहोचली आहे. तेलंगणातील या यात्रेचा 5 वा दिवस गोलापल्ली येथून सुरू झाला. त्यात राहुल यांनी शालेय विद्यार्थी व कार्यकर्त्यांसोबत धावण्याची शर्यत लावून पदयात्रेकरूंत उत्साहाची पेरणी केली. काँग्रेसने या शर्यतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरही पोस्ट केला आहे.

काँग्रेसने या व्हिडिओसह आजच्या यात्रेच्या प्रवासाची काही छायाचित्रेही ट्विट केली आहेत. अन्याय व द्वेषाविरोधात आवाज उठवावाच लागेल. आम्ही भारताला असेच विखरू देणार नाही, असे कॅप्शन काँग्रेसने या फोटोंखाली दिले. राहुल यांनी या यात्रेत आतापर्यंत 1300 किमीहून अधिकचे अंतर पायी कापले आहे.

राहुल गांधी यांनी रविवारी तेलंगणाच्या गोलापल्ली येथून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. यावेळी काही त्यांच्यासोबत काही शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यांनी अचानक या विद्यार्थ्यांना पळण्याची शर्यत लावणार का? अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांनी होकार दिल्यानंतर ते अचानक त्यांच्यासोबत धावू लागले. ते धावत असल्याचे पाहून त्यांचे सुरक्षा रक्षक, तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे धाव घेतली.

काँग्रेसच्या गोटातील सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आज दिवसभरात जवळपास 22 किलोमीटरचा पायी प्रवास करतील. तेलंगणातील या यात्रेचा आजचा 5 वा दिवस आहे. राहुल आज शादनगरच्या सोलीपूर जंक्शनमध्ये एका सभेलाही संबोधित करणार आहेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा गत 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारी ही यात्रा महाराष्ट्रात देगलूरमार्गे 7 नोव्हेंबरला दाखल होईल. त्यानंतर नांदेडमार्गे ही यात्रा 6 दिवसांत तब्बल 383 किमीचे अंतर पार करून करून आपल्या पूर्वनियोजित ठिकाणाकडे मार्गस्थ होईल.

Previous articleHighcourt l पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता, कोणताही गुन्हा नाही
Next article#Nagpur | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी यावी:नागपुरात आम आदमी पार्टीचा यज्ञ, बेरोजगारांसाठी भीकमांगो आंदोलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).