Home ganeshotsav Nagpur । ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आज आगमन

Nagpur । ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आज आगमन

357

नागपूर ब्यूरो। इ.स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते, या मागील थोडक्यांत इतिहास असा की शुर लढव्यय सरकार समशेर बहाद्दूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू) हे अन्यायाच्या विरोधात लढत असतांना ते बंगालच्या स्वारीवर होते.

बंगाल वर विजय मिळवून परत येत असतांना कुळाचारी गणपतीचे विसर्जण झाले होते. बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरीता ह्या मसकऱ्या (हडपक्या) गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या, खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करुण हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. कालांतराने लोकमान्य टिळक हे ही अन्याया विरुध्द स्वातंत्र्यासाठी लढा देतांना महाराजांच्या दुरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले.

श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्काऱ्या (हडपक्या) गणपतीची चालु केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट च्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात.

या उत्सवास यावर्षी 2022 मध्ये 235 वर्ष पूर्ण होत आहे, श्रीमंत राजे खंडोजी महाराजाच्या काळात या गणपतीची 12 हाताची, 21 फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती. त्या अनुषंगाने तसीच मुर्ती 12 हाताची 5 फुटाची गणेशाची मूर्ती स्थापीत केली जाणार आहे. हया गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे. आणी आजही बऱ्याच भक्तांना प्रचिती होत आहे.

गणपतीची आगमन मिरवणुक दि. 12/09/2022 ला दुपारी 04.00 वाजता चितार ओळी (भावसार चौक) येथून मार्ग
क्रमण करून गांधी पुतळा सि.ए. रोड, बडकस चौक, केळीबाग रोड, कोतवाली पोलीस स्टेशन चौक, नरसिंग टॉकिज चौक,
सिनीयर भोसला पॅलेस असा आगमन मिरवणुकीचा मार्ग राहील.

अशी माहिती सारंग ढोक प्रसिद्धि प्रमुख – महाराजा आॉफ नागपूर ट्रस्ट यांनी दिली आहे.

Previous articleशाहीन जमीर हकीम “विदर्भ आयडल पुरस्काराने” सन्मानित
Next articleThunderstorm with lightning very likely over Nagpur and Bhandara
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).