Home Nagpur Nagpur । लातूरच्‍या ‘मुक्‍ती’ एकांक‍िकेला प्रथम पुरस्‍कार

Nagpur । लातूरच्‍या ‘मुक्‍ती’ एकांक‍िकेला प्रथम पुरस्‍कार

379
  • स्‍व. ज. रा. फणसळकर स्‍मृती एकांकिका लेखन स्‍पर्धेचा निकाल जाहीर
  • 11 सप्‍टेंबर रोजी पुरस्‍कार वितरण व एकांकिका महोत्‍सव

नागपूर ब्युरो : संजय भाकरे फाउंडेशन, नागपूरच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या स्‍व. ज. रा. फणसळकर स्‍मृती एकांकिका लेखन स्‍पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लातूरच्‍या अभयकुमार कुलकर्णी यांच्‍या ‘मुक्‍ती’ या एकांकिकेने प्रथम पुरस्‍कार पटकावला आहे.

‘पोहा चालला महादेवा’, ‘अमिबाला उ:शाप हवा’ सारख्‍या अनेक लोकप्रिय नाट्यस‍ंहितांचे लेखक व अभिनेते स्‍व. ज. रा. फणसळकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त त्‍यांच्‍या कुटुंबियांतर्फे एकांकिका लेखन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेला संपूर्ण महाराष्‍ट्रातून तसेच महाराष्‍ट्राबाहेरूनही भरघोस प्रतिसाद लाभला. एकुण 65 एकांकिका स्‍पर्धेसाठी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या त्‍यात अमेरिका व ऑस्‍ट्रेलियातील एकांक‍िकांचाही समावेश आहे. ज्‍येष्‍ठ रंगकर्मी प्रभाकर दुपारे, पराग घोंगे, रमेश लखमापूरे, सुनंदा साठे व शेखर मंगलमूर्ती यांनी या एकांकिकांचे परीक्षण करून त्‍यातून उत्‍कृष्‍ट एकांकिकांची निवड केली.

या स्‍पर्धेतील द्वितीय पुरस्‍कारासाठी अंकुर पांडुरंग ढमाले, मुंबई लिखित ‘सुख विकणारा माणूस’ तर तृतीय पुरस्‍कारासाठी ‘तवंशोधनार्थमं’ या कॆ. सावूल, मुंबई लिखित एकांकिकेची निवड करण्‍यात आली. उत्‍तेजनार्थ पारितोषिक सुदर्शन खोत, मुंबई लिखित ‘CHFEE’ व डॉ. पुष्कर कुलकर्णी, हैद्राबाद यांच्‍या ‘न्यायदेवता’ या एकांकिकेला देण्‍यात येणार आहे.

पुरस्‍कार वितरण सोहळा 11 रोजी

स्‍व. ज. रा. फणसळकर स्‍मृती एकांकिका स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व एकांकिका महोत्‍सव रविवार, 11 सप्‍टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सायंटिफिक सभागृह, आठ रस्‍ता चौक, लक्ष्‍मीनगर येथे आयोजित करण्‍यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून ज्‍येष्‍ठ साहित्यिक, निवेदक प्रकाश एदलाबादकर यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी होणा-या एकांकिका महोत्‍सवात मेघना गोरे लिखित व अभिषेक बेल्लारवार दिग्‍दर्शित ‘शिखंडी’ ही एकांकिका प्रभात क्रिएटिव्ह व्हिजन, नागपूरतर्फे सादर केली जाईल. त्‍यानंतर ‘झाड, कावळा आणि प्रेयसी’ ही नितीन सावळे लिखित व संजय भाकरे दिग्‍दर्शित एकांकिका संजय भाकरे फाउंडेशन सादर करणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन फणसळकर कुटुंबिय व संजय भाकरे फाउंडेशनतर्फे करण्‍यात आले आहे.

Previous articleMaharashtra | थेट सरपंचपदांसह 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
Next articleमहारानी एलिजाबेथ का निधन | स्कॉटलैंड के बाल्मोरल कासल में अंतिम सांस ली, चार्ल्स बनाए गए किंग
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).