Home मराठी संजय राऊतांसाठी राहुल गांधी मैदानात : भाजप व पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

संजय राऊतांसाठी राहुल गांधी मैदानात : भाजप व पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शिवसेनेची बुलंद तोफ मानल्या जाणाऱ्या खा. संजय राऊतांना रविवारी कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. त्यानंतर कोट्राने त्यांना 4 आठवड्यांपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी सगळे दिवस सारखेच नसतात असे नमूद करत भाजप व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर आता थेट काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट करून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री संजय राऊतांना ईडीने अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्विट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘राजाचा संदेश स्पष्ट आहे – जो माझ्याविरोधात बोलेल, त्याला अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मनोधैर्याचे खच्चीकरण करणे व सत्याचे तोंड बंद करण्याचे कसोशिने प्रयत्न होत आहेत. पण हुकूमशहाने ऐकावे, शेवटी ‘सत्या’चाच विजय होऊन अहंकाराचा पराभव होतो.’

Previous articleएकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा वादात : रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरवरून भाषण
Next articleशिंदे-फडणवीसांवर सुप्रिया सुळेंची टीका:कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).