Home मराठी डिझेल टँकर अन् लाकडाच्या ट्रकची धडक; नऊ मजुरांचा होरपळून मृत्यू

डिझेल टँकर अन् लाकडाच्या ट्रकची धडक; नऊ मजुरांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर-मूल महामार्गावर चिचपल्ली अजयपूरजवळ अपघात

मूल महामार्गावर चिचपल्ली अजयपूरजवळ डिझेल टँकर आणि लाकडे वाहून नेणारे दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने डिझेल टँकरचा स्फोट होऊन त्यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले. या भीषण अपघातात ९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० ते १०.४५ च्या सुमारास घडली.

वडसावरून रात्री १०.३० च्या सुमारास चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (एमएच ३१ सीक्यू २७७०) व चंद्रपूरहून मूलकडे जाणारा डिझेल टँकर (एमएच ४० बीजी ४०६०) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टँकरला आग लागली व टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर आगीने राैद्ररूप धारण केल्याने टँकरसह लाकडाचा ट्रक व त्यामध्ये असलेले चालक, क्लीनरसह ७ मजूर असे ९ जण ठार झाले.

ही आग एवढी भीषण होती की त्याचा तडाखा आजूबाजूच्या झाडांनाही बसला. यात रस्त्याच्या कडेला असलेली काही झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही काळ रस्त्यावर केवळ आगडोंब उसळला होता. दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. एक तासानंतर चंद्रपूर येथून अग्निशमन दलाचे बंब आले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शुक्रवारी दुपारपर्यंत दोन्ही ट्रकमधील नऊ मजुरांचे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Previous articleप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफतच्या 2 किलो गव्हाला कात्री; 3 ऐवजी एकच किलो गहू मिळणार
Next articleचंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).