Home बॉलिवूड 17 एप्रिलला आरके हाउसमध्ये रणबीरची वधू बनणार आलिया भट्ट, 18 एप्रिलला वेडिंग...

17 एप्रिलला आरके हाउसमध्ये रणबीरची वधू बनणार आलिया भट्ट, 18 एप्रिलला वेडिंग रिसेप्शन

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची तारीख आता अधिकृत झाली आहे. 17 एप्रिल रोजी आरके हाऊसमध्ये हे कपल साताजन्माच्या गाठीत अडकणार आहे. 14 एप्रिलपासून लग्नविधींना सुरुवात होणार असून 18 एप्रिल रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. आलिया भट्टचे काका, लेखक आणि अभिनेता रॉबिन भट्ट यांनी दिव्य मराठीशी केलेल्या खास बातचीतमध्ये याला अधिकृत दुजोरा दिला आहे. दिव्य मराठीनेही सूत्रांच्या हवाल्याने गुरुवारीच सांगितले होते की, लग्न या तारखांपैकी एका दिवशी होणार असून महेश भट्ट यांनीही शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.

रॉबिन म्हणाले, “लग्नासाठी फक्त जवळचे कुटुंब आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाचे फंक्शन चार ते पाच दिवस चालणार असून, विविध समारंभ असतील. दोघेही आरके हाऊसमध्ये पंजाबी पद्धतीने विवाहबद्ध होतील. लग्नाला एकुण किती लोक येणार याची माहिती माझ्याकडे नाही. कारण मी निमंत्रण पत्रिका पाठवणा-यांपैकी नसून, स्वतः लग्नातील एक पाहुणा आहे. 17 तारखेला लग्न होणार आहे. आम्हाला अद्याप कोणताही ड्रेस कोड सांगण्यात आलेले नाही.”

लग्न याच महिन्यात होणार की नाही याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला असल्याचे रॉबिन यांनी स्पष्ट केले. रॉबिन म्हणाले, ‘आम्हाला भट्ट साहेब आणि सोनी राजदान यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते की, लग्नासाठी तयार राहा. 17 आणि 18 एप्रिलला लग्नाला यायचे आहे.’

Previous article10 एप्रिलपासून 18+ चे लोक खासगी केंद्रांवर बूस्टर घेऊ शकतील, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली घोषणा
Next articleअचानक रुग्णवाढ, दिल्ली-महाराष्ट्रासह 5 राज्यांना केंद्राचे पत्र; म्हणाले- नवीन गाइडलाइन तयार करा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).