Home Nagpur #Maha_Metro | 19 मार्च पासून ऑरेंज मार्गिकेवरील फेऱ्यात वाढ

#Maha_Metro | 19 मार्च पासून ऑरेंज मार्गिकेवरील फेऱ्यात वाढ

सकाळी 6.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध

नागपूर ब्युरो : नागरिकांची सातत्याने होणारी मागणी बघता तसेच शाळा, महाविद्यालय आणि इतर संस्था पूर्ववत झाल्याने शिक्षण किंवा इतर कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महा मेट्रो नागपूरने ऑरेंज मार्गिकेवर (कस्तुरचंद पार्क स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन) गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे.

या वाढीव फेऱ्यां दिनांक १९ मार्च (शनिवार) पासून ऑरेंज लाईन वर सुरु होणार असून या अंतर्गत प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजेपासून दोन्हीही – खापरी तसेच कस्तुरचंद पार्क स्थानकांवरून सुरु होणार आहे. दिवसाची पहिली फेरी ६.३० वाजता झाल्याने आता या मार्गिकेवरील शाळा, महाविद्यालय तसेच इतर संस्थांमध्ये सकाळच्या पाळीत कार्यरत असलेल्या विद्यार्थी किंवा इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गिकेवर शेवटची फेरी रात्री ९.०० वाजताची असेल.

कोरोनावर अतिशय योग्य प्रकारे नियंत्रण मिळाल्याने आता शिक्षणिक आणि इतर व्यावसायिक संस्थांमधील कामकाज पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षण आणि इतर कामाकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. यामुळे ऑरेंज मार्गिकेवर किवा निकटच्या परिसरात असलेल्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या किवा कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची, कर्मचार्यांची सकाळी ६.३० वाजेपासून मेट्रो फेऱ्या सुरु करण्याची मागणी होती. सध्या या मार्गावर पहिली फेरी सकाळी ७.१० मिनिटाने असते.

उल्लेखनीय आहे कि ऍक्वा लाईन मार्गिकेवर (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजता पासून रात्री ९ वाजतापर्यंत उपल्बध होती आता दोन्ही मार्गिकेवर प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजतापासून दर १५ मिनिटाने उपलब्ध असेल. वाढीव फेर्यांप्रमाणे नवीन वेळापत्रक १९ मार्च पासून म्हणजे शनिवार पासून लागू होणार आहे. या वाढीव फेऱ्यांचा नागपूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे.

Previous article#Maha_Metro | सिटी की दिशा और दशा बदल देने वाला ट्रांसपोर्ट है मेट्रो ट्रेन
Next articleहोलिका दहन आज | तीन राजयोग और शनि-शुक्र का सबसे दुर्लभ संयोग, भद्रा के कारण रात में करें होली दहन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).