Home Nagpur Nagpur । गिरीश कुबेर यांच्या “तेल नावाचं वर्तमान” पुस्तकाचे होणार प्रकाशन

Nagpur । गिरीश कुबेर यांच्या “तेल नावाचं वर्तमान” पुस्तकाचे होणार प्रकाशन

नागपूर ब्युरो : डॉ. दंदे फाउंडेशन नागपूर आणि राजहंस प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमा दरम्यान गिरीश कुबेर लिखित “तेल नावाचं वर्तमान” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि कुबेर यांचं व्याख्यान होणार आहे.

सदर कार्यक्रम शनिवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. व्हीआयपी रोड, बोले पेट्रोल पंपाजवळ वनामती सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पुस्तक प्रकाशन आणि गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाच्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती डॉ. दंदे फाउंडेशन नागपूरचे डॉ. पिनाक दंदे आणि राजहंस प्रकाशन नागपूरचे नरेश सब्जीवाले यांनी केली आहे.

Previous articleमेटा महिलाओं के लिए इंटरनेट को सुरक्षित एवं समावेशी बनाने पर दे रहा है विशेष ध्‍यान
Next article#Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स का ग्रैंड एग्जीबिशन कम सेल 19 से नागपुर में
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).