Home मराठी चंद्रकांत पाटील । दाऊदचा फोन आल्‍याने नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही

चंद्रकांत पाटील । दाऊदचा फोन आल्‍याने नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही

नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा दाऊदचा फोन आल्‍याने मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही; असा खळबळजनक आरोप भाजप प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. धडक मोर्चा सुरू होण्‍याआधी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्‍तव्‍य केल्‍याने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ माजली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आज आझाद मैदानात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाकडे जात असताना पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे गोंधळ झाल्याने सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे आता ठाकरे सरकार मलिकांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यासेबतच मीडीयाशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीए. दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तर नवाब मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी देखील मागणी चद्रकांत पाटील यांनी केली आहे. मलिक कारागृहात असताना मंत्रीपदावर आहेत आणि हे योग्य नाही त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी काढली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

Previous articleआदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या पुणे आणि मुंबईतील ठिकाणांवर आयटी चे छापे
Next articleखासगी शिक्षकही जनआरोग्य योजनेत, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आश्वासन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).