Home मराठी #Nagpur | जेएनएआरडीडीसी चा नॉन-फेरस धातु क्षेत्रातील परिघीय अर्थ व्यवस्थेमध्ये पुढाकार

#Nagpur | जेएनएआरडीडीसी चा नॉन-फेरस धातु क्षेत्रातील परिघीय अर्थ व्यवस्थेमध्ये पुढाकार

नागपूर ब्यूरो: जेएनएआरडीडीसी,  खाण मंत्रालयासोबत, देशाच्या भविष्यातील विकासाच्या निती ठरवणाऱ्या निती आयोगाच्या नेतृत्वाखाली नॉन-फेरस धातु क्षेत्रातील परिघीय अर्थव्यवस्थेवर काम करत आहे. हा एक आर्थिक दृष्टीकोन आहे ज्याचा उद्देश कचरा नष्ट करणे आणि निसर्गाला पुरक असणाऱ्या संसाधनांचा सतत वापर करणे आहे जिथे जैविक उत्पादनांचे जीवन चक्र हानिकारक कचरा निर्माण करत नाही आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. परिघीय अर्थव्यवस्थेची संकल्पनेमुळे निरंतर विकास आणि औद्योगिक उत्पादन दोहोंचाही फायदा होतो.

कोविड नंतरच्या काळात भारत सरकार, नॉन-फेरस मेटल क्षेत्राच्या विविध पैलूंमध्ये जसे की संसाधन पुरवठा, तांत्रिक स्वातंत्र्य, कमी आयात अवलंबित्व इत्यादींमध्ये आत्मनिर्भर बनण्याचे आणि मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण करणे, देशांतर्गत स्पर्धात्मकता वाढवणे, यासाठी परिघिय अर्थव्यवस्थेवर अत्यंत आक्रमकपणे काम करत आहे. “निति आयोगधातू क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाच्या कल्पनेचे नेतृत्व करत आहे आणि पोलाद मंत्रालयाला देशातील नॉन-फेरस मेटल क्षेत्रात परिघिय अर्थव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. भागधारकांशी अनेक सल्लामसलती केल्यानंतर, पोलाद मंत्रालयाने स्टील, अॅल्युमिनियम, तांबे आणि जस्त यासह विविध धातूंसाठी आधारभूत माहिती आणि शिफारशी प्रदान करणारा “धातू क्षेत्रातील परिघिय अर्थव्यवस्था” या विषयावरील अहवाल संकलित केला आहे. अहवालाच्या शिफारशींच्या आधारे निति आयोगाने नियामक कृती, संस्थात्मक कृती, उत्स्फूर्त कृती आणि इतर  समस्यांसह मुख्य अहवाल  निर्धारित केला आहे आणि संबंधित मंत्रालये व संस्थांना जबाबदाऱ्या नियुक्त केल्या आहेत.

अल्युमिनिअम, तांबे, शिसे आणि झिंक या नॉन-फेरस धातूंच्या परिघिय अर्थव्यवस्थेवरील देशाच्या अहवालाच्या संदर्भात महत्त्वाचे पायाभूत कार्य पार पाडण्याचे काम, प्रशासकीय विभाग  “खाण मंत्रालय” ने नागपूर शहरस्थित जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटर (JNARDDC) कडे सोपवले आहे, अशी माहिती संचालक अनुपम अग्निहोत्री यांनी दिली.  

जेएनएआरडीडीसी पहेले पासुन करत असलेल्या नॉन-फेरस धातु क्षेत्राशी संबंधित काही कार्य असे आहे; शून्य कचरा धोरण, सिमेंट उद्योगात लाल माती (Red Mud)  आणि स्पेन्ट पॉटलाइनचा वापर, झिंक डस्ट रिसायकलिंगसाठी एसओपी, कचरा आणि भंगारांसाठी विस्तारित उत्पादकाची जबाबदारी, परिघिय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमता यावर जागरूकता कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत देवाणघेवाण कार्यक्रम इत्यादी. तसेच, मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी भागधारकांची मते आणि उद्दीष्ट प्राप्तीसाठी  बैठकांची मालिका आयोजित केली जात आहे. हे सर्व उपक्रम कालबद्ध आहेत आणि खाण मंत्रालय व निति आयोग या प्रगतीचा वेळोवेळी   आढावा घेत असतात.

जेएनएआरडीडीसीला खाण मंत्रालयाने मेटल रिसायकलिंग अथॉरिटी म्हणून आधी नामांकित केले आहे त्यामुळे ही संस्था अॅल्युमिनियम, तांबे, शिसे आणि झिंकच्या पुनर्वापरासाठी तांत्रिक आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात गुंतलेली आहे. परिघिय अर्थव्यवस्था उत्तेजना अंतर्गत खाण मंत्रालयाने जेएनएआरडीडीसीला दोन महत्त्वाचे संशोधन प्रकल्प मंजूर केले आहेत १) मुंजाल युनिव्हर्सिटी, गुरुग्राम आणि श्री रामकृष्ण अभियांत्रिकी महाविद्यालय कोईम्बतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कास्ट अॅल्युमिनिअम मिश्रधातूंचे बिनमिश्रित पुनर्वापर २) 2) टाटा  अॅडव्हान्स्ड सीस्टीम्स लिमिटेड (एक एरोस्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी) च्या सहकार्याने अॅल्युमिनियम स्वॅर्फ्सचे सॉलिड-स्टेट रीसायकलिंग. संस्थेचा डाउनस्ट्रीम विभाग मेटलर्जिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी पार्श्वभूमीच्या शास्त्रज्ञांसह आर एन चौहान, वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ आणि वी एन एस यु वी  अम्मू वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि तीन कनिष्ठ शास्त्रज्ञ आर अनिल कुमार, आय राजू, अनस एनएस या संदर्भात कौतुकास्पद कार्य करत आहेत.

तसेच, जेएनएआरडीडीसी परिघिय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमताबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी परिषदांचे आयोजन करत आहे. १) भारतातील नॉन-फेरस धातु रिसायकलिंगवर एक दिवसीय विचारमंथन, नागपूर शहरातील इंटरनॅशनल बॉक्साईट अॅल्युमिना अँड अॅल्युमिनियम सोसायटी (IBAAS) यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर 2022 मध्ये, (2) कॉर्पोरेट मॉनिटर, कोलकाता;  अॅल्युमिनियम असोसिएशन ऑफ इंडिया आणि मेटल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै 2022 मध्ये नॉन-फेरस धातुवरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICNFM-2022) दरम्यान “अलोह उद्योगासाठी शाश्वतता साध्य करण्यासाठी पुनर्वापराचे योगदान” या विषयावर उपग्रह सत्र. जेएनएआरडीडीसी एप्रिल 2022 मध्ये  नागपूर शहरातील रिसायकलर्स, उत्पादक, संशोधन आणि शैक्षणिक संस्था इत्यादींसोबत एक दिवसीय बैठक आयोजित करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे नॉन-फेरस धातु  क्षेत्रातील परिघिय अर्थव्यवस्थेच्या कल्पनांवर चर्चा होईल.

Previous article#Nagpur | राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय के क्षेत्रीय कार्यालय में आजादी का अमृत महोत्सव पर कार्यशाला संपन्न
Next article#Nagpur | IGNOU Exams starting from 4th March 2022
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).