Home Naxal टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

983

नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात यश

गडचिरोली ब्यूरो: गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

दिनांक 23/02/2022 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. 04 च्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने, मोठ¬ा प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगलपरिसरात लपवुन ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधुन काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे.

सदर डंपमध्ये त्यंाना जिवंत कुकर बॉम्ब 1 नग, कुकर 04 नग, जिवंत डेटोनेटर 01 नग, जिलेटीन (जेली) 04 नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे 06 नग, गन पावडर 45 ग्रॅम, मोबाईल चार्जर स्विच 01 नग, तुटलेला मोबाईल चार्जर 01 नग, नक्षल शर्ट 01 नग, नक्षल पॅन्ट 01 नग व नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य मोठ¬ा प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असुन इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरु आहे.

टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांचे लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन, सामान्य नागरीकांना वेठीस धरुन बळजबरीने टिसीओसी सप्ताह पाळावयास भाग पाडणे नक्षलवादयांना आता अडचणीचे ठरणार आहे.

सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सां. यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाचेे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले.

Previous articleरूस-यूक्रेन जंग के बीच शेयर मार्केट धड़ाम, सेंसेक्स 2000 पॉइंट्स टूटा, 100 डॉलर के करीब पहुंचा कच्चा तेल
Next article#Maha_Metro | मेट्रो ट्रेन में गूंजी किलकारियां
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).