Home Defence प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू । विशाखापट्टणम किनारपट्टीवर आज नौदल शक्तीचा आविष्कार

प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू । विशाखापट्टणम किनारपट्टीवर आज नौदल शक्तीचा आविष्कार

343

हिंदी महासागरात सोमवारी भारतीय नौदलाची शक्ती अवतरणार आहे. अर्थात, प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यूचे आयोजन विशाखापट्टणम किनारपट्टीवर करण्यात आले असून कवायती सादर करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना दिली जाणार आहे. या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मिनिस्टर ऑफ स्टेट देवसिन्हा चव्हाण, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी, राज्यपाल बिश्वभूषण हरिचंदन, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार उपस्थित राहणार आहेत

प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू ही नौदलाची मानाची कवायत. यात तिन्ही सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना एका विशेष फॉर्मेशनमध्ये येत मानवंदना दिली जाते. नौदलाची सर्व लढाऊ जहाजे, विनाशिका, पाणबुड्या विमानवाहू जहाजांचा समावेश यात असेल. नौदलाच्या ४० जहाजांवर अशी राेषणाई करण्यात आल्याने रात्री अंधारात अथांग सागरात प्रकाशमान झालेल्या युद्धनौका नागरिकांना आकर्षित करत होत्या.

भारतीय नौदल, तटरक्षक दल, नौव्हन निगम आदींचा सहभाग. – चित्तथरारक कसरतींमधून दाखवली जाते नौदलाची सज्जता. – भारतात १९५३ मध्ये सर्वप्रथम प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू झाला होता. – आतापर्यंत ११ वेळा रिव्ह्यू, दर पाच वर्षांनी केले जाते आयोजन.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वप्रथम नौदलाच्या सज्जतेवर भर देण्यात आला होता. मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांनी मराठा साम्राज्याच्या नौका एकत्र आणत नौदल सज्जता केल्याचे इतिहासात संदर्भ आढळून येतात.

Previous article“Khasdar Adyogic Mahostav” is planned from 12 to 14th March
Next articleतेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).