Home Maharashtra Maharashtra । महिला आर्थिक सक्षमीकरण- महिला उद्योजकांना पाठबळ पुरवण्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम

Maharashtra । महिला आर्थिक सक्षमीकरण- महिला उद्योजकांना पाठबळ पुरवण्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम

644

“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक विशेष उपक्रम आहे, ज्यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम व शास्वत उद्योगात रूपांतर करता येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र राज्य, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च” (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” राबविण्याचे नियोजित केले आहे.

हा कार्यक्रम प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी आखला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत असून, निवडलेल्या १२० महिला उद्योजकांना हे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे . प्रस्तावित प्रशिक्षणामधे स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी यावर देखील लक्ष केंद्रित कले जाईल.

इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 2५ फेब्रुवारी 2022 असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण 8 मार्च 2022 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होईल.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी

महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018” जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणतील मुख्य उद्दीष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्ट-अप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ चा समावेश आहे.

या धोरणाची उद्दीष्टये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना,उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. ४ जानेवारी २०२१ रोजी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली. या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे स्टार्ट-अप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे हे आहेत.

Previous articleपहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर, दुसऱ्या पत्नीस फॅमिली पेन्शनचा हक्क नाही; हायकोर्टाचा निर्णय
Next article#Maha_Metro | परियोजना लोकाभिमुख बनाना महा मेट्रो का लक्ष्य : डॉ. दीक्षित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).