Home मराठी Maharashtra । अनिल देशमुखांशी संबंधित बारा ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम

Maharashtra । अनिल देशमुखांशी संबंधित बारा ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम

539

१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे. देशमुखांशी संबंधित सीएंसह इतर बारा ठिकाणी शनिवारी सकाळी सीबीआयने सर्च ऑपरेशन सुरू राबवले. तब्बल साडेचार तास ही कारवाई सुरू होती. विशाल खटवानी या सीएसह देशमुखांचे भागीदार सुधीर बाहेती यांच्यासह इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

छाप्यासाठी दिल्ली, मुंबई येथील सीबीआय अधिकाऱ्यांसह १० पथके तयार करण्यात आली होती. नागपूर महिला पोलिसांचे एक पथकही सोबत घेतले होते. शनिवारी सकाळी ७ वाजता सीबीआय पथक कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये सीएच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. काही कागदपत्रे ताब्यात घेतली. डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधित ही धाड असल्याची माहिती आहे.

Previous articleमंत्री नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समीर वानखेडे मागासवर्गीय असल्याचे सिद्ध
Next articleIPL ऑक्शनचा दुसरा दिवस । आतापर्यंत 86 खेळाडूंची विक्री, कृष्णप्पा गौतमचे मूल्य 10 पटीने घटले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).