Home मराठी ठाकरे सरकारचा समीर वानखेडे यांना दणका; नवी मुंबईतील सद्गुरु बारचा परवाना अखेर...

ठाकरे सरकारचा समीर वानखेडे यांना दणका; नवी मुंबईतील सद्गुरु बारचा परवाना अखेर रद्द

474

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबईतील माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्या मालकीचा नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेल अँण्ड बारचा परवाना अखेर रद्द केला आहे. परवाना रद्द करण्याचे आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने दिला आहे. 1997 मध्ये समीर वानखेडे यांनी बारचा परवाना मिळवला होता. परवाना घेत असताना त्यांचे वय अठरा पेक्षाही कमी होते. या कारणावरुन त्यांच्या मालकीच्या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

1997 मध्ये परवाना घेत असताना समीर वानखेडे यांचे वय अठरा पेक्षाही कमी होते. मात्र त्यांनी खोटी माहिती देऊन शासनाकडून हॉटेल अँण्ड बारचा परवाना घेतला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून समीर वानखेडे यांच्या बारचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. एनसीबीच्या बदलीनंतर समीर वानखेडेंना हा दुसरा मोठा धक्का लागला आहे. 3

गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या अवैध बार प्रकरणी खुलासा केला होता. मलिक यांनी काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांनी बारचा परवाना घेतला तसेच यूपीएससीत नोकरी करत असताना त्यांनी बार सुरू केला. असे वक्तव्य मलिक यांनी केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा पाठपुराव करण्यात आला असून, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला आहे.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात संपुर्ण देशात चर्चेत आलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची काही दिवसांपूर्वीच डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. मुंबई एनसीबी जॉईन करण्यापूर्वी वानखेडे हे डीआरआयमध्ये होते. त्यांची पुन्हा घरवापसी करण्यात आली आहे.

Previous articleBudget 2022 | टैक्स स्लैब में कोई बदलाव नहीं, मिडिल क्लास को मायूसी, कॉरपोरेट को राहत
Next article‘हिंदुस्थानी भाऊ’ची न्यायालयात माफी; आंदोलनाला पैसे कुणी दिले याची चौकशी करणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).