Home हिंदी त्या समाजकंटकांना तातडीने अटक करा : चंद्रशेखर बावनकुळे

त्या समाजकंटकांना तातडीने अटक करा : चंद्रशेखर बावनकुळे

680

नागपूर : मौदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्थापित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची कोणीतरी अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली आहे. या गंभीर आणि संतापजनक प्रकाराबाबत पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार करण्यात आली आहे. हे समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घेऊन दोषींवर कारवाई क़रावी, अशी मागणीवजा विनंती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

या प्रकरणी नागरिकांनी शांतता राखावी असे नम्र आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावे. समाजात भांडणे व्हावीत असेच षडयंत्र हे समाजकंटक रचत असतात, आपण त्यांना बळी पडू नये. पोलिसांनी या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना तातडीने अटक करावी, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Previous articleइधर तबादला हुआ रद्द, उधर तुकाराम मुंढे ने नागपुर को कहा ‘गुड बाई’
Next articleकोराडी वीज केंद्रात FGD सिस्टम लावण्यात उशीर का?, खा. तुमाने यांची सीआयडी चौकशीची मागणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).