Home Education School Reopen | पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी...

School Reopen | पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा

355

पुणे ब्युरो : पुण्यातील शाळा मंगळवार 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे.

इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण (Vaccination)केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे.

पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Previous article“शाब्बास… दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात…!” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन
Next articleहादसा । गांधीधाम-पुरी एक्सप्रेस की पैंट्री कार में लगी आग, फायर ब्रिगेड मौके पर मौजूद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).