Home हिंदी राज्यात 1 फेब्रुवारीला कॉलेज सुरू; दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

राज्यात 1 फेब्रुवारीला कॉलेज सुरू; दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

375

कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष १ फेब्रुवारी पासुन सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मान्यता दिली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे शाळांप्रमाणेच महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल, ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार. १५ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या किंवा ऑनलाइन, याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.

सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. मात्र १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू असतानाही महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नव्हता. राज्यात व देशात १५ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्याने इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटण्या सारखे असून शासनाने तत्काळ शाळा- महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी करण्यात येत होती.

Previous articleRepublic Day | 73वां गणतंत्र दिवस मनाने के लिए देश तैयार, जानें कहां और कैसे देखें Live परेड
Next article75 एयरक्राफ्टस ने किया फ्लाईपास्ट, 160 जवानों ने 59 कैमरों के जरिए कैप्चर किया नजारा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).