Home Azadi Ka Amrit Mahotsav शाळा उघडण्याबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या...

शाळा उघडण्याबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत

551

तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. परिणामी सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये खलबते सुरू आहेत. यावर गुरुवारी (२० जानेवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री राज्य कोरोना कृतिदलाची बैठक आहे. त्यातील सूर लक्षात घेऊन गुरुवारी शाळांचा निर्णय होऊ शकतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काेरोना स्थिती नियंत्रणात असल्याने शाळा लवकर उघडण्याचा निर्णय होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने तशी मागणी मंत्रिमंडळासमोर करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या प्रारंभी आपण 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यापूर्वी शाळा उघडण्याचा निर्णय होऊ शकतो, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक गुरुवारी होणार आहे.

Previous articleपत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करुन पतीनेही केली आत्महत्या, नागपुरातील घटना
Next articleअनिल देशमुख यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, जामिनाला ईडीचा विरोध
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).