Home Police गेल्या 24 तासात मुंबईत 81 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात 31 पॉझिटिव्ह

गेल्या 24 तासात मुंबईत 81 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात 31 पॉझिटिव्ह

463

मुंबई पोलिसांनी शनिवारी माहिती दिली की, 81 मुंबई पोलिस कर्मचारी हे गेल्या 24 तासात कोरोना संक्रमित आढळले आहेत. यासोबतच शहरात एकूण कोरोना संक्रमित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 1312 झाली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या एकूण 126 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे.

तर पुण्यात शनिवारी 31 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोपबतच पुण्यात कोरोना संक्रमित पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 465 झाली आहे. मुंबईत शनिवारी 10661 नवीन प्रकरणे समोर आली. तर 11 लोकांच्या मृत्यूंची नोंद झाली. शहरात सध्या 73518 अॅक्टिव्ह केस आहेत.

मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसचे 10,661 नवीन प्रकरणे समोर आले. तर 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याविषयी माहिती दिली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 29 जुलैनंतरपासून एका दिवसात मृत्यूचे सर्वात जास्त प्रकरणे समोर आले होते. त्या दिवशी संक्रमणामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 46,205 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान 43,389 लोकांचा डिस्चार्ज मिळाला आहे आणि 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण अॅक्टिव्ह केस वाढून 2.64 लाख झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात 71.70 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 67.60 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1,41,779 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्या पॉझिटिव्हिटी रेट 23.08% आहे.