Home कोरोना मुंबईत गेल्या 24 तासात 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर एका कर्मचाऱ्यांचा...

मुंबईत गेल्या 24 तासात 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर एका कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

505

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रोजच कोरोनाचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाची चिंता आता आणखीणच वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा फटका आता फ्रंटलाईन वर्कर्सला देखील बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 126 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकुण 643 पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 33 हजार 470 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासादायक म्हणजे 29,671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 69 लाख 53 हजार 514 इतका झाला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतके आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. देशात गेल्या 24 तासात 1.67 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलादायक म्हणजे 69 हजार 798 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 277 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 8 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण आकरा दिवसांपूर्वी हा आकडा फक्त एक लाख होता.