Home कोरोना Booster । आरोग्य कर्मचारी, सहव्याधिग्रस्त ज्येष्ठांना आजपासून बूस्टर डोस

Booster । आरोग्य कर्मचारी, सहव्याधिग्रस्त ज्येष्ठांना आजपासून बूस्टर डोस

621

दुसऱ्या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक

राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवार, १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षे अथवा त्यावरील वयाच्या सहव्याधिग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन तसेच स्टँडिंग टेक्निकल सायंटिफिक कमिटी यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू होत आहे. राज्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध असेल. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्‍य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास ते १० जानेवारी २०२२ पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पात्र असतील.

निकष : १० एप्रिल २०२१ पूर्वी डाेस घेतला असावा १. १० एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी दुसरा डाेस घेतलेला आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक हे १० जानेवारी २०२२ रोजी प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घेण्याकरिता पात्र असतील. २. दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण हवेत. हा निकष लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. ३. संबंधित लाभार्थींनी आधी कोविशील्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशील्ड लसीची मात्रा देण्यात येईल. ज्यांनी आधी कोव्हॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोव्हॅक्सिन लसीची मात्रा देण्यात येईल.

६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याची किवा दाखवण्याची आवश्यकता नाही, मात्र अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल, मात्र ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी, ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन अॅपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे अशा लाभार्थींना शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रावर थेट येऊन नोंदणी करता येईल.

त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र-ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थींना खासगी केंद्रात लस घ्यावयाची असेल तर त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची त्यांना मुभा असेल.

Previous articleशादी के एक माह बाद पति विक्की के साथ शेयर किए फोटो
Next articleथैंक यू यूजर्स : ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ के विज़िटर्स 4 लाख पार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).