Home मराठी अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सूद यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; विधानसभेची घोषणा...

अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सूद यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; विधानसभेची घोषणा होताच निर्णय

596

अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सुद सच्चर यांनी हातात काँग्रेसचा झेंडा घेतला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मालविका सुद सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी मालविका यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, मालविका पंजाबच्या मोगा येथून काँग्रेसच्या उम्मेदवार असणार आहे. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी कमलजीत सिंह बराड यांनी मालविकाच्या पक्ष प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वीच सोनू सुदने आपल्या बहिणीच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबद कल्पना दिली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोनू सुद यांनी आपली बहिण मालविका राजनीतीमध्ये येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आपण राजकारण जाणार नसल्याचे सोनूने स्पष्टपणे सांगितले होते. सोनू सुदचे कुटुंब पंजाबच्या मोगा जिल्ह्यापासून ताल्लुक या ठिकाणी राहते. गेल्या वर्षी परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनूने मोठी मदत केली होती.

त्यानंतर सोनू राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाली होती. काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सुद यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून सोनू राजकारण पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना उधाण आले होते. त्यानंतर अखेर शनिवारी मालविका यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

गेल्या महिन्यात सोनू सुद यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतली होती. यापुर्वी सोनू सुद यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते की, मला दोन पक्षांकडून राज्यसभेसाठी ऑफर दिली जात आहे. मात्र मी यांच्या राज्यसभेच्या ऑफरला नाकारल्याचे सोनू म्हटला होता.

Previous articleवादानंतर अखेर जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे, 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
Next articleकोरोना के हालात पर मोदी की इमरजेंसी मीटिंग, वैक्सीनेशन तेज करने को कहा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).