Home Defence सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचे कारण : खराब हवामानामुळे झाली...

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचे कारण : खराब हवामानामुळे झाली दुर्घटना

360

सीडीएस जनरल बिपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी ट्राई सर्विस कमेटीचा अहवाल समोर आला आहे. ट्राईने हा अहवाल वायुसेना प्रमुखाला सोपवले आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे त्या अहवालात सांगितले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एयर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या कमेटीने हा अहवाल तयार केला आहे.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आले आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू

लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील मोठ्या पदावरील अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते.

Previous article#Nagpur | महा हँडलूम्सच्या राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद
Next articleकभी 5 रु का था एचडीएफसी बैंक का शेयर, 3500 रु को बना दिया 1 करोड़ रुपये
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).