Home Social #Nagpur | भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

#Nagpur | भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

637

नागपूर ब्यूरो: कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त शुरविरांना अभिवादन करण्यात आले.


या वेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी उपस्थितांना भीमा कोरेगांव येथील भीमा नदीच्या काठी झालेल्या युध्दात 500 महार शुरविरांनी 28000 पेशव्यांना लढा देवून कसा विजय प्राप्त केला या बद्दल माहीती दिली. भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात कार्यक्रमा प्रसंगी ठेवण्यात आली आहे. ही प्रतिकृती मनोज नगरकर, हरदास नगर कामठी यांनी साकारलेली आहे.
या प्रसंगी ओगावा सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी, दादासाहेब कुंभारे मजदुर बिडी उत्पादक सहकारी संस्था, जय भारत सोसायटी, इत्यादी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व धम्मसेवक, धम्मसेवीका प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार
Next article#Nagpur | शशि चैरिटेबल ट्रस्ट के ओल्ड एज होम ‘बसेरा’ का उद्घाटन रविवार को
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).