Home मराठी #Amravati | थर्टी फर्स्टला निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी केला मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम

#Amravati | थर्टी फर्स्टला निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी केला मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम

409

अमरावती ब्युरो : कोण दिवस येईल कसा कोण जाणतो! आजचा दिवस आपला आहे. उद्याचा आपल्या हातात नाही. हा विचार करून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:च्या तेरवीचा कार्यक्रम जिवंतपणी केला. तेही थर्टी फर्स्टचं निमित्तं साधून. याच कारण जाणून घ्याल तर थक्क व्हालं.

सुखदेव डबरासे हे अमरावतीतील रहाटगाव येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक. पोलीस दलात असताना 35 वर्षे नोकरी केली. पण, काही सहकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर लवकरच मरण पावले. काही सहकाऱ्यांचा चार-सहा महिने काढले. त्यानंतर त्यांना मृत्यूने जवळ केले. कुणी वर्षभर सेवानिवृत्तीचा आनंद घेतला. पण, तो खरा आनंद नव्हताच. सेवानिवृत्तीनंतर वर्षभरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याचा अर्थ त्यांनी सेवानिवृत्तीचा आनंद नाही घेतला, असं डबरासे यांना वाटलं.

डबरासे म्हणतात, मी साडेपाच वर्षांपासून पेन्शनचा आनंद घेत आहे. साठी ओलांडली, तरी उत्साही आहे. मी अजून जिवंत आहे. पण, सहकाऱ्यांसारखा मरणानंतर गेट टुगेदर म्हणजे तेरवीचा कार्यक्रम पाहायला मी नसणार. त्यामुळं जिवंतपणीच हा कार्यक्रम घेण्याचं मी ठरविलं. सहाजिकच असं कुणी करत नाही. त्यामुळं कुटुंबामध्ये नाराजी होती. एका मुलीची या कार्यक्रमाला नाराजी होती. सुरुवातीला पत्नीचीसुद्धा नाराजी होती. पण, त्या दोघींनाही मी माझ्या बुद्धीप्रमाणे समजावून सांगितलं.

कार्यक्रम तेरवीचा आहे, असं जरी सांगितलं. तरी मी जिवंत आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आनंदात साजरा करा, हे त्यांना समजलं. त्यामुळं त्याची या कार्यक्रमात सहभागी झाल्यात, असं स्वत:च्या तेरवीचा कार्यक्रम करणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुखदेव डबरासे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मित्र-नातेवाईक, शेजारी यांना तेरवीचं स्वतः आमंत्रण दिलं. त्यासाठी त्यांनी पत्रिका छापल्या. त्या वाटप केल्या. घरी पेंडाल उभारला. पूजा केली. येणाऱ्या पाहुण्यांसाठी सेवानिवृत्त श्री डबरासे साहेब आपले सहर्ष स्वागत करीत आहेत, असं त्यांनी घराबाहेर लिहिले. येणाऱ्या प्रत्येकाशी गप्पा मारल्या. एकंदरित हर्षोल्लासात कार्यक्रम झाला. नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणाचा यथेच्च आनंद घेतला. अशाप्रकारे त्यांचा थर्टी फर्स्ट साजरा झाला नि तेरवीचा कार्यक्रमही…

Previous articleराजस्थानात 73 वर्षांच्या वृद्धाने गमावला जीव, 7 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह
Next articleमंत्री, आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).