Home Education कुलगुरू निवडीचे अधिकार सरकारकडे, राज्यपालांच्या अधिकारात कपात, काय नव्या विधेयकात?

कुलगुरू निवडीचे अधिकार सरकारकडे, राज्यपालांच्या अधिकारात कपात, काय नव्या विधेयकात?

502

सरकार-विरोधकांना आमनेसामने आणणारे व राज्यपालांचे अधिकार कमी करणारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) विधेयक २०२१ अखेर मंगळवारी गोंधळात मंजूर करण्यात आले. राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर आता थेट अंकुश सरकारचा असणार आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. राज्यपालांचे अधिकार कमी करण्याबद्दलच्या या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरू झाली. विद्यापीठ सुधारणा विधेयक संयुक्त समितीकडे सहा महिन्यांसाठी विचारार्थ पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली. त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. या विधेयकावर आजच चर्चा करून विधेयक संमत करण्यावर सत्ताधाऱ्यांनी भर दिला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत चालले.

काय नव्या विधेयकात?
पूर्वी कुलगुरू निवडताना समिती ५ नावे निश्चित करत असे. ती नावे राज्यपालांना पाठवली जात असत. त्यातील एक नाव राज्यपाल निश्चित करत असत. आता समितीकडून पाच नावे सरकारकडे येतील. त्यातील दोन नावे सरकार राज्यपाल यांना कळवेल. पैकी एक नाव राज्यपाल ३० दिवसांत निश्चित करतील.

Previous articleएके 47 असो की बॉम्ब, रासायनिक हल्ले सुद्धा ठरतील फेल; अशी आहे पीएम मोदींची 12 कोटी रुपयांची नवीन कार
Next articleअवकाळी पावसाचा फटका; शेतकरी चिंतातूर, पिकांचे नुकसान; पंचनामे होणार काय?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).