Home हिंदी पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीवर अशा थाटात निरोप कधीच बघितला नसेल…

पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीवर अशा थाटात निरोप कधीच बघितला नसेल…

आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांना ख़ास अंदाजात पुणे पोलिसांनी दिला निरोप

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची गडचिरोली परिक्षेत्रात डीआयजी पदावर बढतीवर बदली झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. ज्या थाटात पुणे पोलिसांनी आपल्या या अधिकाऱ्यास निरोप दिला तो आता सोशल मीडिया मध्ये वेगाने वायरल होत आहे.

https://www.facebook.com/100002665001778/videos/3231377230294412/?extid=9uISrqFtXue1qrgg

जयपाल रामदास सुमन जाधव यांनी फेसबुक वर हां वीडियो शेयर केलाय. याप्रसंगी अनेक अधिकारी भावुक झालेले दिसत आहेत. संदीप पाटील यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत,राबविलेले विविध उपक्रम तसेच त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ 1100 गुन्हेगारांना मोक्का, तडीपार इत्यादी सारख्या कारवाया केल्या. यामुळे ते पुणे जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध झाले. इथे महत्वाचे हे देखील की जेव्हा सातारा येथून त्यांची पुण्याला बदली झाली तेव्हा त्यांची बदली रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

बूके नको, बुक आना
आयपीएस अधिकारी संदीप पाटील जेव्हा सातारा चे पोलिस अधीक्षक होते तेव्हा त्यांनी स्वागताला बूके नको, बुक आना अशी विनंती केली होती. या अपील वर खूप पुस्तके जमा झाली. तेव्हा संदीप पाटील यांनी ही पुस्तके गड़चिरोलीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवून दिली.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? अबतक नहीं किया है तो अभी क्लिक करें (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here