Home मराठी #Nagpur | नागपुरात सर्वत्र धुक्याची चादर, विमान उड्डाण थांबलं; वाहन चालवितानाही अडचणी!

#Nagpur | नागपुरात सर्वत्र धुक्याची चादर, विमान उड्डाण थांबलं; वाहन चालवितानाही अडचणी!

376

नागपूर ब्युरो : नागपूरसह परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळं नागपूर विमानतळावरून आज सकाळी उडणारे विमानं थांबलं. व्हिजीबीलीटी कमी असल्यानं विमान उड्डानावर परिणाम झालाय. शहरात सकाळी धुक्याची चादर असल्यानं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत.

नागपुरात गेले दोन दिवस थंडी कमी आहे. कमाल तापमान 14.4 अंश सेल्सिअसवर गेलंय. पण, गारठा वाढलाय. नागपूरसह विदर्भात आज आणि उद्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. नागपूर हवामान विभागानं ॲारेंज अलर्ट जारी केलाय.

विदर्भात तुरळक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबरला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. सोमवारी सायंकाळी वातावरण थंडावले. पाऊस आल्यास थंडी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेळ्या मेंढ्या मोकळ्या जागेत चरावयास टाळावे. पीक सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवावे. शेतकरी आणि पशुपालकांनी पिके आणि जनावरे यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं केलंय.

28 डिसेंबर रोजी विदर्भातील गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा फटका बसू शकतो. 27 डिसेंबरलाही विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भात नागपूर आणि गडचिरोलीच्या तापमानात जास्त घट झालीय.

Previous articleमुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुसाट! अहवाल अंतिम टप्प्यात; रावसाहेब दानवेंनी दिली प्रकल्पाबाबत माहिती
Next article#Nagpur | 100 गाठे बांधने का नेशनल रिकॉर्ड बनाएंगे भवन पटेल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).