Home हिंदी #Gadchiroli। लोक बिरादरी प्रकल्पात नवीन व्यायमशाळा इमारत आणि आर्ट रूम चे उद्घाटन

#Gadchiroli। लोक बिरादरी प्रकल्पात नवीन व्यायमशाळा इमारत आणि आर्ट रूम चे उद्घाटन

521

गडचिरोली ब्युरो : 23 डिसेंबर 2021 रोजी हेमलकसा येथील आदिवासी विकासासाठी अविरत कार्य सुरू असणाऱ्या लोक बिरादरी प्रकल्प ला 48 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने नवीन व्यायमशाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि आर्ट रूम चे उद्घाटन होणार आहे.

नागपूरचे प्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ आणि संस्थेचे ट्रस्टी जितेंद्र नायक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. वर्धापन दिनाचे औचित्य साधून दवाखान्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपातील ‘समर्पित बिरादरी’ या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन होईल.

प्रकाशन झाल्यावर सदर अंक लोक बिरादरी प्रकल्प च्या वेब साईट वर सर्वांना वाचण्यास उपलब्ध असेल. पुढील २-३ दिवस शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ होतील. 26 डिसेंबर रोजी बाबा आमटे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात येईल. प्रकल्पातील सर्व शिक्षक आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील. अशी माहिती लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी दिली आहे.