Home मराठी अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड; चांदीवाल आयोगाचा वेळ फुकट घालवल्याबद्दल कारवाई

अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड; चांदीवाल आयोगाचा वेळ फुकट घालवल्याबद्दल कारवाई

596
चांदीवाल आयोगाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. देशमुखांचे वकिल गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांना आयोगाने हा दंड ठोठावला आहे. आज चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्याचे वकिलच आज गैरहजर राहिले. आजच्या सुनावणीत सचिन वाझेची उलटतपासणी करण्यात आली.

ज्यासाठी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांनाही जेल प्रशासनाने आयोगापुढे हजर केले. मात्र वाझेची उलटतपासणी घेण्यासाठी अनिल देशमुखांचे वकीलच गैरहजर राहिल्याने आयोगाचे मंगळवारचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड मदत मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या तपासणीत वाझेंनी वसुली बाबत आपला जबाब नोंदवला होता. त्यावेळी वाझेंनी म्हटले होते की, अनिल देशमुखांनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केलीच नव्हती. असा जबाब आज सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे. अनिल देशमुख यांचे वकिल गिरीश कुलकर्णी यांनी वाझेंची उलट तपासणी केली असता, त्यावेळी वाझेंनी देशमुखांकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करण्यात आलेली नाही. असे जबाब सचिन वाझेंनी नोंदवला आहे. बार चालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधितांकडून आपण कोणत्याही प्रकारे पैसे घेतले नसल्याचे देखील वाझेंनी आज चांदीवाल आयोगाकडे म्हटले होते.

अनिल देशमुखांना चांदीवाल आयोगाने याआधीही दंड ठोठावला होता. यापूर्वीही त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे वेळ मागितल्याने देशमुखांना 15 हजारांचा दंड लावण्यात आला होता. आणि पुन्हा वकिलाच्या गैरहजर प्रकरणी आयोगाने 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Previous articleOmicron । धोक्याची घंटा! ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र; वॉर रूम सक्रिय करण्याची सूचना
Next articleचहापानावर बहिष्कार । फडणवीस म्हणाले- आमदारांचे निलंबन मागे घ्या, अधिवेशनात आम्ही बोलू नये अशीच व्यवस्था
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).