Home मराठी #Maharashtra | तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली आहे का?; असदुद्दिन...

#Maharashtra | तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली आहे का?; असदुद्दिन ओवेसींचा हल्लाबोल

558

तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीकास्त्र केले. आपण सर्व एकत्र येऊन काम करूयात, समाजाच्या यशासाठी एकत्र लढा असायला पाहिजे. असेही ते म्हणाले.

मुंबईत कलम 144 लागू केल्यावरून देखील ओवेसींनी टीकास्त्र केले ते म्हणाले की, एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत येऊ नये म्हणून ओमायक्रॉनच्या नावावर कलम 144 लागू करण्यात आली. जर राहुल गांधी मुंबई येणार असते तर जमावबंदी लागली असती का? असा सवाल देखीवल ओवेसींनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

राज्यातील थ्री इन वन सरकार आरक्षण काय असते ते विसरली आहे. हे तीनही पक्ष दाबून खातात आणि स्वातंत्रलढ्यात सहभागी न झालेले राष्ट्रवाद सांगतात. मुस्लिमांनी शिक्षण घेऊ नये अशी अनेकांची भावना आहे, मुस्लिम शिक्षण का घेऊ शकत नाही? किती मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत? असे म्हणत ओवसींनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली.


#Gadchiroli । शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य लीना पठाण सन्मानित

Previous article#Gadchiroli । शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य लीना पठाण सन्मानित
Next articleरात्री उशिरा पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक: हॅकर्सने बिटकॉइन कायदेशीर करण्यासाठी ट्विट केले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).