Home Maharashtra ‘आ देखे जरा किस में कितना है दम!’ जामीन मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी...

‘आ देखे जरा किस में कितना है दम!’ जामीन मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी मलिकांचे ट्विट

272
0
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली.

दरेकरांच्या ट्विटला आता मलिकांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहेत. मलिकांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आ देखें जरा किसमें कितना है दम” असे खुले चॅलेंज मलिकांनी प्रवीण दरेकर आणि मोहित कंबोज यांना दिले आहे. विशेष म्हणजे मलिकांनी ट्विट करताना प्रवीण दरेकरांना देखील टॅग केले आहे.

मलिकांना जामीन

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मोहित कंबोज मानहानी प्रकरणात जामीन मिळाला आहे. माझगाव न्यायालयाने मलिक यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. यासोबतच, कोर्टाने नवाब मलिक यांना 5000 रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 डिसेंबर रोजी होणार आहे.

काय म्हणाले दरेकर

प्रवीण दरेकर यांनी सोमवारी एक ट्विट करून मलिकांच्यावर ठोकण्यात आलेल्या 100 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, असे ट्विट दरेकर यांनी केले आहे.

फडणवीसांना टोला

नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सत्तेच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे. चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए !!!, असे कवितेच्या ओळी म्हणत मलिकांनी फडणवींवर टीका केली.

कोण आहेत मोहित कंबोज?

आर्यन खानच्या अटकेनंतर चर्चेत आलेले मोहित कंबोज मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःला भाजप कार्यकर्ता म्हटले आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये ते भाजपमध्ये विविध पदांवर होते. 2016 ते 2019 पर्यंत त्यांनी भाजपच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्ष पद भूषविले होते. ऑगस्ट 2019 पासून ते मुंबईत भाजप सरचिटणीस आहेत. त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप सुद्धा करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील क्रुझ पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. त्यावर एनसीबीने केलेली ही कारवाई बोगस असून समीर वानखेडे हे आर्यनला फसवण्याचे काम करत असल्याची टीका मलिकांनी केली होती. मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मलिक यांनी अनेक आरोप केले.

त्यात त्यांनी मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावरही काही आरोप केले होते. या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाल्याचा दावा कंबोज यांनी करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here