Home Maharashtra #Maharashtra | दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, पोलिसात गुन्हे दाखल करणार:...

#Maharashtra | दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, पोलिसात गुन्हे दाखल करणार: नवाब मलिक

425
मुंबई ब्युरो : गेल्या दोन महिन्यांपासून मी काही प्रकरण उघड केली आहेत. तेव्हापासून माझ्यावर काही लोक पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरोधात मी लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराची रेकी करण्यात येत असल्याबाबतची माहिती दिली. काही पक्षाचे कार्यकर्ते काही, लोकं आमच्या घराच्या ऑफिसची माहिती काढत आहेत. घरातील मुलं, माझे नातू कोणत्या शाळेत शिकतात त्याचा शोध घेत आहेत. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन लोकं कॅमेरा घेऊन माझ्या घराच्या बाहेर फोटो काढत होते. फोटो काढत असताना या लोकांना परिसरातील लोकांनी अडवलं. त्यामुळे हे लोक पळून गेले. पण त्यांना टिळक टर्मिनसला अडवलं गेलं. पकडल्या जाऊ म्हणून घाबरून पळाल्याचं या लोकांनी सांगितलं, असं मलिक म्हणाले.

पोलीस आयुक्तांना भेटणार

काल मी ट्विटर आणि फेसबुकवर या लोकांचे फोटो टाकले. त्यातील एका व्यक्तीची माहिती मिळाली आहे. दोन महिने जे काही चालत होतं, त्यावेळी ही व्यक्ती माझ्याविरोधात सातत्याने ट्विट करत होता. गाडीमालकाचंही नाव समोर आलं आहे. मी जे काही बोलत आहे, त्यावरून त्याचा काही लोकांशी संबंध असल्याचं दिसतंय. या प्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. तसेच पोलीस आयुक्तांना भेटून त्याची माहिती देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

हवी असेल तर सर्व माहिती देईन

आम्ही एखाद्या ठिकाणी काही कागदपत्रं घ्यायला जातो किंवा तक्रार करायला जातो. तिथं तिथं हा व्यक्ती हजर असल्याचं आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं आहे. हे खूप गंभीर आहे. माझी माहिती हवी असेल तर मी सर्व माहिती देईन. पण ही हेरगिरी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.

Previous article#Maharashtra । महाजेनको व राज्य खनिकर्म महामंडळाच्या निविदा फेरफारमध्ये 1250 कोटींचा भ्रष्टाचार
Next articleFernando Di Norova । आपल्या जगातील एक असं बेट तिथे रोज फक्त 420 लोकांनाच मिळते एन्ट्री
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).