Home Covid-19 यूरोप, आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक, मोदींनी तातडीची बैठक बोलवली

यूरोप, आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक, मोदींनी तातडीची बैठक बोलवली

434

 

नवी दिल्ली ब्युरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. या बैठकीचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडेच असेल. ही बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात तातडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

यूरोप आणि आफ्रिकेतील स्थितीवर चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत यूरोपात झालेला कोरोनाचा विस्फोट आणि तिथल्या काही देशांना पुन्हा करावं लागलेलं लॉकडाऊन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन यासंदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये यूरोप आणि आफ्रिकेत निर्माण झालेल्या स्थितीनंतर भारतानं कोणती काळजी घ्यावी. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांबद्दल कोणते निर्णय घेण्यात यावेत या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

लसीकरणावर देखील चर्चा

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी भारतात कोविशील्ड, कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक वी या लसींना परवानगी देण्यात आली आहे. भारतानं शंभर कोटींच्यालसीकरणाचा टप्पा यापूर्वीच पूर्ण केला आहे. मात्र, सध्या कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारनं हर घर दस्तक ही मोहीम राबवली आहे. कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यासदंर्भात देखील नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

केंद्राचे राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश

भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

Previous article30 दिवसांत 2400 विद्यार्थी पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातील सर्वाधिक 1700; विवाहसोहळ्यांना सामील होणारे बनले सुपर स्प्रेडर
Next article#Nagpur। हवाला व्यापाऱ्यांवर पोलिसांची सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड जप्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).