Home BJP विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह निवडणुकीच्या रिंगणात

643

मुंबई ब्युरो : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळेंना संधी

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक सामना

भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालं आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात खलबत्ते सुरू झाली आहेत. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांच्या कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी
  • कोल्हापूर : अमल महाडिक
  • धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल
  • नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे
  • अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल
  • मुंबई : राजहंस सिंह
Previous articleमहापालिकेतील ‘किंग मेकर’ अजातशत्रू सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन
Next article#maharashtra । 22 नोव्हेंबरपासून 863 ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता, 1249 ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणुका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).