Home Farmer @SunilKedar । बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कटीबद्ध, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक...

@SunilKedar । बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कटीबद्ध, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग

416
बैलगाडा शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. राज्यात बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी केदार आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राने बैलगाडी शर्यत सुरू होण्याबाबत 2017 रोजी कायदा संमत केला होता. तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

त्यानंतर, शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून, पुढील आठवडयात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे केदारे यांनी नमूद केले.

देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाडांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यशासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वरीष्ठ अधिवक्ता म्हणून अॅड. मुकूल रोहतगी, अॅड. शेखर नापडे आणि अॅड. सचिन पाटील यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची 400 वर्षांपेक्षा जूनी पंरपरा आहे. “बैलगाडी शर्यत” हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपण करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे.

शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे गावांच्या जत्रा भरत नाहीत. शेतकऱ्यांच्या जीवनातील हा सांस्कृतिक भाग म्हणून याकडे पाहण्यात यावे. अशी मागणीही बैलगाडा संघटनेकडून असल्याचेही केदार यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश येंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशात भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी श्री रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हे ही याप्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत.

#Amravati । भाजपाच्या वतीने आज जिल्हा बंदचे आवाहन, परिस्थिती शांत, काही ठिकाणी सकाळपासुन संचारबंदी लागू

Previous article#Amravati । भाजपाच्या वतीने आज जिल्हा बंदचे आवाहन, परिस्थिती शांत, काही ठिकाणी सकाळपासुन संचारबंदी लागू
Next article#Gadchiroli । 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जवान परतले, ढोल-ताशे वाजवून केले स्वागत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).