Home Maharashtra #Maharashtra । अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात, शांती ठेवण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

#Maharashtra । अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात, शांती ठेवण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

481
त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यात नांदेड, नाशिक, अमरावती या जिल्ह्यात बंदला हिंसक वळण आल्याच्या घटना घडल्या.

त्यापार्श्वभुमीवर आज अमरावतीत जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला देखील आता हिंसक वळण लागले आहे. भाजपने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या.

त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला शांती ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, अमरावती वळगता संपूर्ण राज्यात शांती आहे. अमरावतीकरांनी देखील हिंसा न करता शांती ठेवावी. काही जण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे वळसे पाटील म्हणाले. अमरावतीत कोणीही जातीच्या नावाने भडकवण्याचे प्रयत्न केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शुक्रवारी घडलेल्या हिंसाचारात मालेगावमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दहा जणांना पोलीसांनी अटक देखील केली आहे. नागरिकांनी शांती धरावी. असे आवाहन वळसे पाटलांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांनी प्रदर्शित करतांना घटनेची वेळ दाखवावी

“चॅनल्सनी वार्तांकन करताना जी दृश्य दाखवत आहे, ती चित्र दाखवताना वेळही नमूद करावे” असे गृहमंत्री म्हणाले. “कोणालाही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. निवेदन देण्यापुरता परवानगी होती” असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

सरकार पाडण्याचे भाजपचे कारस्थान- संजय राउत

मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले, हे ठरवून करण्यात आहे आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राला अशाप्रकारे चूर लावण्याचा प्रकार करू नये, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका. अमूक खाते कुणाकडे हे महत्त्वाचे नाही, महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ते महत्त्वाचे आहे.

भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करूच शकत नाही, भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे मोठे कारस्थान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून सरकारला काय चरोट्या उठत नाही, आम्ही मनाने आणि कामाने खंबीर आहोत. आता दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याचे यांचे कारस्थान सुरू आहे. असे संजय राउत म्हणाले.

दरम्यान, त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या बंददरम्यान नांदेड शहरासह मालेगावात तणाव निर्माण झाला होता. देगलूर नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, तर शिवाजीनगर भागात दुपारी अडीचच्या सुमारास 30 ते 40 जणांच्या जमावाने दुकानावर दगडफेक करत नासधूस केली.

बाफना नाका रस्त्यावर देशी दारूच्या दुकानासमोरील रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. काही काळ शहरात तणाव निर्माण झाला. प्रत्येक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

#Gadchiroli | गडचिरोलीत सकाळपासूनच पोलिस, नक्षलींमध्ये चकमक; C-60 पथकाची कारवाई

Previous article#Gadchiroli | गडचिरोलीत पोलिस, नक्षलींमध्ये चकमक; 26 नक्षलवाद्यांचा खात्मा
Next articleNagpur | नागपुरात पोलिसांचा रूट मार्च
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).