Home मराठी #Nagpur । ज्येष्ठ नागरिकांची अखेरपर्यंत सेवा करत राहणार : दत्ता मेघे

#Nagpur । ज्येष्ठ नागरिकांची अखेरपर्यंत सेवा करत राहणार : दत्ता मेघे

484

नागपूर ब्यूरो : राजकारण करतांनाच समाजकारणाचा विसर पडू न देणारे व सामाजीक दायीत्वाचे सदैव भान ठेवणारे माजी खासदार श्री दत्ताजी मेघे यांचा गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021 रोजी 86 वा वाढदिवस होता.

दत्ताजी मेघे यांनी संकल्पपूर्तीची शिखरे गाठतांना एक उत्कृष्ट संघटक म्हणुन आयुष्यात काम केलेले आहे. त्याच कारणाने नागरीकांसोबत त्यांचे राजकीय, जातीय व धार्मीक बाबींच्या पलीकडील संबध प्रस्थापीत झालेले आहेत.

त्याचीच प्रचिती वाढदिवसाप्रसंगी दिसुन आली. या प्रसंगी अनेक मान्यवर व लहान थोरांनी तसेच समाजसेवेच्या ब्रिद कार्यात नेहमीच सहभागी राहीलेल्या सामाजीक व पक्षीय कार्यकत्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या हृदयस्पर्शी प्रसंगी अनेक नागरीक भावूक झाल्याचे चित्र दिसुन आले. जेष्ठ समाजसेवकानी शुभेच्छा देतांना त्यांना पुढील आयुष्य निरोगी व आनंददायी जावो, अशा भावना व्यक्त केल्यात.

त्या प्रसंगी दत्ताजी मेघे यांनी सुध्दा आपल्या भावना व्यक्त करतांना मी माझ्या कार्यकाळात विविध माध्यमातून लोकसेवा, गरीब व गरजुंना प्रासंगिक मदत करून सामाजीक दायीत्वाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजीक कार्य करतांना जस जसे माझे वय वाढत गेले तशी मला जेष्ठत्वाची जाण झाली व पूढील आयुष्यात जेष्ठ नागरीकांसाठी शक्य त्या सेवा देण्याची कल्पना मला सुचली. त्या करिताचा जेष्ठ नागरीक प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेची स्थापना सुध्दा केलेली आहे.

या प्रतिष्ठानास अधिक मजबूत करण्याचे उद्देशानेच मा. श्री. नितीनजी गडकरी हे अध्यक्ष व मी स्वत: कार्याध्यक्ष म्हणून काम करित आहे. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मी आयुष्याचे अखेरपर्यंत जेष्ठ नागरीकांची मनापासून सेवा करणार असल्याचे भावोद्गार यांनी काढले. त्यावेळी त्यांचे पुत्र सागर मेघे व आमदार समीर मेघे सुध्दा उपस्थित होते.

दत्ताजी मेघे यांना वाढदिवसानिमीत्त केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी व राज्याचे विरोधी पक्षनेते श्री देवेन्द्रजी फडणवीस आणि राज्यातील अनेक मंत्री, राज्यमंत्री व आमदारांनी सुध्दा दुरध्वनीवरून त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणा-यांमध्ये प्रामुख्याने महापौर दयाशंकरजी तिवारी, खासदार डॉ. विकासजी महात्मे, माजी मंत्री सतिश चतुवैदी, विनोद गुडधे (पाटील), प्रकाश गजभिये, नरेंद्र पांडे, दिनानाथ पडाळे, सुधाकर देशमुख, गिरीश गांधी, अशोक धवड, बाबुराव तिडके, गिरीधर राठी, महेश पुरोहीत, डॉ. दिलीप गोडे, गौरीशंकर पाराशर, प्रतापसिंह चव्हाण, राजेंद्र बनवारीलाल पुरोहीत, दिलीप पनकुले, किशोर कन्हेरे, रघुनाथ मालीकर (गुरूजी), हरीश दिकोंडावार, बाळ कुळकर्णी, नितीन चौधरी, अशोक येवले, कामील अन्सारी, उदय टेकाडे, डॉ. राजु मिश्रा, महमुद अन्सारी, शरद भस्मे, प्रोफेसर इंगोले, आतिष उमरे, धनराज आष्टनकर, नितीन देवतळे, विनोद ठाकरे, विकास दाभेकर, विशाल भोसले, उमेश आंबटकर, गजेंद्र खोबे, अंजली कानफाडे, आदर्श पटले, अनिल ठाकरे, प्रकाश झुरमुरे, विजय मरसकोल्हे, संजय कपनीचोर, प्रशांत केवटे इत्यादी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Previous article#Instagram | जल्द ही सब्सक्रिप्शन मॉडल शुरू करने की खबरें, हर महीने देने होंगे 89 रुपए
Next article#Investment | आज से आपको मिलेगा सबसे सेफ इन्वेस्टमेंट का नया ऑप्शन; क्या है आरबीआई की रिटेल डायरेक्ट स्कीम?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).