Home Cricket #T20WC2021 | न्यूझीलंड-अफगाणचा सामना ठरवणार भारताचे भविष्य, सामना दु. 3.30 वाजता

#T20WC2021 | न्यूझीलंड-अफगाणचा सामना ठरवणार भारताचे भविष्य, सामना दु. 3.30 वाजता

610

टी-20 वर्ल्ड कपच्या 40 व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता हा सामना अबूधाबीमध्ये खेळवण्यात येईल. चार पैकी तीन सामने जिंकून न्यूझीलंडचा संघ सुपर -12 च्या ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या आणि अफगाणिस्तान दोन विजयासह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड या सामन्यात जिंकल्यास उपांत्य फेरी गाठेल तर अफगाणिस्तानसोबतच भारतसुद्धा या स्पर्धेतून बाहेर पडेल. परंतु न्यूझीलंडचा संघ पराभूत झाल्यास भारताचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल.

न्यूझीलंडने भारताला सहज पराभूत केले. परंतु नामीबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध त्यांचा कस लागला. मात्र किवीजच्या खेळाडूंनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. दुसरीकडे अफगाणिस्तानला भारताने धूळ चारली होती. त्यामुळे आता अफगाणला आपल्या फिरकीपटूंकडून जास्त अपेक्षा आहेत. दुखापतीतून सावरलेला मुजीब संघात परतण्याची शक्यता आहे. स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीची पुनरावृत्ती अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात करण्यास तयार आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचा संघ पाचवा विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. स्पर्धेतील 41 वा सामना पाकिस्तानविरुद्ध स्काॅटलंडदरम्यान होणार आहे. पाकने आतापर्यंत 4 सामने खेळले असून, सर्व सामने जिंकले आहेत. तर स्कॉटलंडने सुद्धा साखळी सामन्यात चांगली कामगिरी केली. परंतु सुपर -12 मधील सर्व चारही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करणे अवघड ठरणारे आहे. स्कॉटलंडची फलंदाजी सर्वच सामन्यांत ढेपाळली आहे. तर पाकिस्तानचे फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे सेमीफायनलपूर्वीची विजयी परंपरा कायम ठेवण्यावर पाकिस्तानचा भर राहील. दोन्ही संघात आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने झाले असून सर्व पाकिस्तानने जिंकले.

#ChhathPuja2021 | जानिए छठी मैय्या को प्रिय हैं कौन से 6 फल? डाले में जरूर रखें

Previous article#ChhathPuja2021 | जानिए छठी मैय्या को प्रिय हैं कौन से 6 फल? डाले में जरूर रखें
Next article#NZvsAfg | हर भारतीय की जुबान पर “तेरी जीत-मेरी जीत, तेरी हार-मेरी हार” मैच से पहले आई मीम्स की बाढ़
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).