Home Diwali #Diwali | लक्ष्मी पूजनासाठी दिवसभर राहतील 5 शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजेचा...

#Diwali | लक्ष्मी पूजनासाठी दिवसभर राहतील 5 शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजेचा विधी

529

गुरुवार 4 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी पूजन आणि दिवाळी सण साजरा होणार आहे. भागवत आणि विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार, कार्तिक महिन्याच्या अमावास्येला समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. यासोबतच वाल्मिकी रामायणात असे लिहिले आहे की, या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. स्कंद आणि पद्मपुराणात सांगितले आहे की, या दिवशी दीप दान करावे, यामुळे पाप नष्ट होतात.

दिवाळीला दिव्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या आधी कलश, गणेश, विष्णू, इंद्र, कुबेर आणि देवी सरस्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा दिवाळीत तूळ राशीत चार ग्रह असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत असल्याचे ज्योतिषी सांगतात. या दिवशी केलेल्या उपासनेचे शुभ परिणाम लवकर प्राप्त होतात.

लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त
ऑफिस

सकाळी 11:20 ते दुपारी 01:07 पर्यंत
दुपारी 02:50 ते संध्या 04:20 पर्यंत

दुकान

दुपारी 02:50 ते संध्या 04:20 पर्यंत
संध्या 05:34 ते रात्री 08:10 पर्यंत

फॅक्ट्री

सकाळी 09:00 ते 11:19 पर्यंत
रात्री 11:40 ते 12:31 पर्यंत

घर

दुपारी 02:50 ते संध्या 04:20 पर्यंत
संध्या 05:34 ते रात्री 08:10 पर्यंत
रात्री 11:40 ते 12:31 पर्यंत

 

Previous article#Diwali | छोटी दिवाली- नरक चतुर्दशी आज, जानिए शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व
Next article#Nagpur | स्वामीनारायण मंदिर में समर्पण सेवा समिति की एम्बुलेंस का पूजन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).