Home BJP #nagpur | शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भाजपचे जनआक्रोश आंदोलन

#nagpur | शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भाजपचे जनआक्रोश आंदोलन

512
नागपूर ब्युरो : भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीण तर्फे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान (रामगिरी) सिव्हील लाईन नागपूर यथे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता गेलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात एन दिवाळीत अंधार पसरत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर पणे उत्तरे द्यावीत अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी माफी मागावी. अशी मागणी आम्ही या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी केली.

जिल्हातील 5 हजार हेक्टर मधील सोयाबीनचे नुकसान झाले, 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक कापसाचे नुकसान झाले, संत्रा अवकाळी पावसामुळे बहार आला नाही व नंतर मृग बहार आला नाही. अतिपावसामुळे आंबिया बहार गळाला, धानावर तुडतुडा रोग आला, सोयाबीनवर मोझेंक रोग आला, बोंड अळी कापसावर आली उत्पन्न 2-3 क्विंटल वर आले. सरकारने कोणताही सर्वे केला नाही. थातूर मातुर प्रस्ताव शासनाला पाठवला त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

2 वर्षा पासून शासनाकडून कुठलीही मदत झाली नाही व नुकसान भरपाई सुध्दा मिळाली नाही, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, येथे महापुरामुळे नुकसान झाले. त्यात 10000 करोड चे नुकसान भरपाईचे पैकेज जाहीर झाले परंतु विदर्भातील शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाकडून होत आहे. शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे, काय करावे सुचत नाही. दिवाळी कशी करावी, सन वार कसे करावे, पोरा-पोरींचे वय झाले म्हणुन लग्न करायला निघाले तर पैसा नाही, अशा दैनीय परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिल झाला आहे,

गेल्या महिनाअखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 28 लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीविमा कंपन्यांना दिलेल्या 973 कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकीकवडीदेखील पडलेली नाही. शेतातील विजेचे बिल भरू शकत नाही म्हणुन लाईन कापली जात आहे, 100 युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करण्याची घोषणा केली, पर्यंतू तिही घोषणा फुसकी निघाली.

या आंदोलनात राष्टीय किसान मोर्च्याचे महामंत्री माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशउपाध्यक्ष संजय भेंडे,जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, उपेंद्र कोठेकर, आ. गिरीश व्यास, आ. टेकचंद सावरकर, सुधिर पारवे, आनंद राऊत, किशोरजी रेवतकर, श्रीकांत देशपांडे, अविनाश खळतकर, इमेश्वर यावलकर, अजय बोढारे,संध्याताई गोतमारे, प्रकाश टेकाडे, आदर्श पटले, रामराव मोहाडे, अंजलीताई कानफाडे, विलाश ठाकरे, निलेश बुचुंडे, देवा तेलोते, जिल्हा भाजप प्रसिद्धी प्रमुख कपिल आदमने व मोठ्या संख्येत शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

#Diwali | धनतेरस पर होता है कुबेर, लक्ष्मी, धन्वंतरि व यमराज का पूजन

Previous article#nagpur | राज्य स्तरीय तेंग सु डो स्पर्धा में नागपुर को 8 गोल्ड, 4 सिल्वर मेडल
Next article#nagpur । सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी मतदानाचे कर्तव्य निभवा : जिल्हाधिकारी आर. विमला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).