Home Covid-19 #COVID19 । चीनच्या लान्झोउमध्ये लॉकडाऊन, 40 लाख लोकसंख्येला घरांमध्ये राहण्याचे आदेश

#COVID19 । चीनच्या लान्झोउमध्ये लॉकडाऊन, 40 लाख लोकसंख्येला घरांमध्ये राहण्याचे आदेश

514
चीनच्या अनेक भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने उत्तर-पश्चिमी शहर लान्झोउमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. आपत्कालीन परिस्थितीतच लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

चीनमध्ये कोरोना संसर्गाची 29 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी 6 प्रकरणे लॅन्झोउमध्ये आढळून आली आहेत. लॅन्झोउ शहर ही वायव्येकडील गांसु प्रांताची राजधानी आहे. येथील लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे.

अधिका-यांनी सांगितले की, लान्झोउमध्ये लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. लोकांना केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. स्थानिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वाढत्या कोरोना प्रकरणांबाबत चीनचे प्रशासन अत्यंत सतर्क आहे. उत्तर चीनमधील हजारो लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, पर्यटन स्थळांवर लोकांची ये-जा मर्यादित करण्यात आली आहे. स्थानिकांना अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच शहराबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग वाढत आहे. सोमवारी, इनर मंगोलियाच्या एजिन काउंटीमधील लोकांना घरी राहण्यास सांगितले गेले. एजिनची लोकसंख्या 35,700 आहे. त्यांना कोविड निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एजिन हे कोरोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात येथे 150 हून अधिक नवीन संक्रमित आढळले आहेत.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने इशारा दिला आहे की सुमारे एका आठवड्यात कोविडचा संसर्ग 11 राज्यांमध्ये पसरला आहे. अशा स्थितीत आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे. देशातील ज्या भागात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, तिथल्या लोकांना बीजिंगमध्ये येण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. जेव्हा ते कोविड चाचणी अहवाल दाखवतील तेव्हाच त्यांना राजधानीत प्रवेश मिळेल. हा अहवाल 2 दिवसांपेक्षा जास्त जुना नसावा. तसेच, त्यांच्यावर 2 आठवडे लक्ष ठेवले जाईल.

@dhananjay_munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार

 

Previous article@dhananjay_munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे केली तक्रार
Next article#maharashtra । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).