Home Crime Gadchiroli | जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास...

Gadchiroli | जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

शासनाने जाहीर केले होते 2 लाख रूपयांचे बक्षीस

गडचिरोली ब्यूरो : पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीत दि. 18-19/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे पेरमिली जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना रात्रौच्या वेळी गस्त घालत असतांना जहाल नक्षली मंगरु कटकु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे. या नक्षलीने यापुर्वी सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोस्टेवर हल्ले करणे यासारखे हिंसक गुन्हे केलेले आहेत.

नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा विसामुंडी पोमके नारगुंडा ता. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी असलेला मंगरु मडावी हा पेरमिली एलओएस मध्ये पेरमिली एलओएसच्या सदस्य पदावर भरती होवुन ॲक्शन टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधीत असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदुर संघटनेचा वरिष्ठ कॅडर होता.

सन 2021 मध्ये पोमके बुर्गी हद्दीत उपसरपंच रामा तलांडी याच्या खुनात तसेच पोमके बुर्गी पोस्ट अटॅकमध्ये त्याचा समावेश होता. त्याच्यावर 03 खुन, 01 चकमक असे एकुण 04 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पाडण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.


  • भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेचे आम्ही पालन करतो. वाचकांना एखाद्या बातमी विषयी आपली तक्रार करायची असल्यास आमच्या वेब माध्यम तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. प्रकाशक : (ई-मेल)- aatmnirbharkhabar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here