Home Defence AISSEE 2022 । सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी आता थोडेच दिवस...

AISSEE 2022 । सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी आता थोडेच दिवस बाकी

देशातील 33 सैनिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालीय. सहावी आणि नववी या दोन्ही वर्गांसाठी प्रवेश अर्ज घेतले जात आहेत. सैनिक शाळा सहावी आणि नववीची प्रवेश परीक्षा 2022 जानेवारी मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेतली जाईल. या परीक्षेचे नाव अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) आहे.

9 जानेवारीला होणार प्रवेश परीक्षा

सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 रविवार 9 जानेवारी 2022 रोजी National Testing Agency (NTA) द्वारे आयोजित केली जाईल. जर तुम्हाला सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अंतिम मुदतीचा वाट न पाहता अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

प्रवेश वेळापत्रक 2022 : महत्वाच्या तारखा
  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2021 ते 26 ऑक्टोबर 2021
  • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर रात्री 11.50 पर्यंत
  • भरलेल्या ऑनलाइन फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी – 28 ऑक्टोबर 2021 ते 02 नोव्हेंबर
  • डाऊनलोड करण्याची तारीख प्रवेशपत्र 2021 – NTA च्या वेबसाईटवर नंतर कळवले जाईल
  • प्रवेश परीक्षेची तारीख – 09 जानेवारी 2022
  • परीक्षेची वेळ – सहावीसाठी दुपारी 2 ते 4.30, वर्ग नववीसाठी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत परीक्षा होईल
  • निकालाची तारीख संध्याकाळी- NTA द्वारे नंतर जाहीर केली जाईल
प्रवेश परीक्षेसाठी असा करा अर्ज

सैनिक शाळा प्रवेश अर्ज वेबसाईट aissee.nta.nic.in वर दाखल करता येणार आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. AISSEE 2022 मध्ये प्रवेश अर्जासाठी शुल्क भरावे लागेल. खुला, ओबीसी नॉन क्रिमीलेअर (केंद्रीय यादीनुसार) आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या माजी सैनिक मुलांसाठी अर्ज शुल्क 550 रुपये आहे. एससी, एसटी श्रेणीसाठी अर्ज शुल्क 400 रुपये आहे. हे शुल्क देखील फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

सैनिक शाळा प्रवेश हेल्पलाईन

सैनिक शाळा प्रवेश 2022 शी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी एनटीएने हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केला आहे. तुम्ही सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 011-40759000 किंवा 011-69227700 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही aissee@nta.ac वर ईमेल पाठवून तुमच्या समस्येचे निराकरण देखील करू शकता.

MPSC UPDATE । ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाने ट्विटद्वारे दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here