Home Dhammachakra Pravartan Din तथागत गौतम बुद्धांचे विश्वशांती तसेच पंचशीलाचे तत्वज्ञान जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान

तथागत गौतम बुद्धांचे विश्वशांती तसेच पंचशीलाचे तत्वज्ञान जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान

624

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे प्रतिपादन

नागपूर ब्युरो : तथागत गौतम बुद्धांचे विश्वशांतीचा संदेश देणारे तसेच पंचशीलाचे तत्वज्ञान जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज कामठी नागपूर येथे केले . 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल दादासाहेब कुंभारे परिसर कामठी येथे आयोजित धम्मचक्र महोत्सवाच्या मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा , नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कामठीचे आमदार टेकचंद सावरकर तसेच ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख अ‍ॅड. सुरेखाताई कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या .

भगवान गौतम बुद्धाचा जन्म , दीक्षा तसेच महानिर्वाण या महत्त्वाच्या घटनांशी संबंधित उत्तर प्रदेश, बिहार मधील लुंबिनी, सारनाथ, कुशिनगर या बुद्धीस्ट सर्किट मधील 20 हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयातर्फे सुरू आहे पुढील वर्षी याचे उद्घाटन होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली . जगभरातील पर्यटक या सर्किटच्या माध्यमातून या स्थळांना भेट देतील . बुद्धांचा विचार हा केवळ बौद्धधर्मीयार्यंतच मर्यादित नसून हा विचार जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचेल . ड्रॅगनपॅलेस मधील शांतीपुर्ण वातावरण येथील वृक्षराजी ही आनंददायक असून भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती समोर होणाऱ्या शांतीची अनुभूती अवर्णनिय आहे , असे सुद्धा गडकरी यांनी यावेळी सांगितलं . केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस परिसरात वस्त्रोद्योग प्रशिक्षण देण्याच्या प्रकल्पाचे काम हे स्तुत्य असून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित समाज घटकांना आत्मनिर्भर होण्यासाठी हे प्रकल्प लाभदायी ठरतील असेही गडकरी यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याप्रसंगी विपश्यनेचे महत्व अधोरेखित केले ड्रॅगन पॅलेस च्या उभारणीत जपानचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.संपुर्ण जग पादाक्रांत केलेला विचार हा बुद्ध धम्माचा विचार आहे. भारताच्या भूमीत सृजन झालेला हा विचार जपान सारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने रूढ झाला असून मानवतेला शांती देणारा आणि दुःख निवारक असा तो विचार आहे असं राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी याप्रसंगी बुद्धिस्ट थीम पार्कची संकल्पना मांडली. ड्रॅगन पॅलेस च्या माध्यमातून अगरबत्तीचे क्लस्टर तसेच टेक्सटाईल क्लस्टर मधून प्रशिक्षणाचे काम तसेच रोजगाराचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितलं .

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाच्या स्फृती प्रकल्पांतर्गत अगरबत्ती प्रकल्पाचा शुभारंभ, प्रशिक्षणाच्या नोंदणीप्रमाणपत्राचे वाटप तसेच थायलॅंड येथून दान स्वरूपात प्राप्त झालेल्या भगवान बुद्धांच्या मूर्तीचा वितरण यावेळी पार पडले. या कार्यक्रमाला ओगावा सोसायटीचे पदाधिकारी कामठी येथील धम्म उपासक उपस्थित होते.

CM Uddhav Thackeray । पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही

Previous articleCM Uddhav Thackeray । पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही
Next articleIPL 2021 | चेन्नई सुपरकिंग्स को एमएस धोनी ने चौथी बार जिताया खिताब, कोलकाता की हुई हार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).