Home Maharashtra Chipi Airport Inauguration। 12 वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – नारायण राणे एकाच...

Chipi Airport Inauguration। 12 वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – नारायण राणे एकाच मंचावर येणार

584

सिंधुदुर्ग ब्युरो : कोकणवासियांसाठी आज खरोखर मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

मागील अनेक महिन्यांपासून चिपीच्या श्रेयवादावरुन बरीच लढाई महाराष्ट्राने पाहिली. आज त्या लढाईचा शेवट सिंधुदुर्गच्या विकासाच्या आड येणाऱ्या सेनेच्या नेत्यांची नावे फोडून करु, असा इशारा राणेंनी दिला आहे. तर सेनेनेही खासदार विनायक राऊतांना विमानतळ निर्मितीचं श्रेय देत राणेंवर पलटवार केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन

चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत. उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली असून 12 वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एका मंचावर येत असल्याने, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलंय. कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

Previous article‘SUPER 60’ । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा
Next articleSocial Media | एक हफ्ते में दूसरी बार डाउन हुए फेसबुक-इंस्टाग्राम, कंपनी ने मांगी माफी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).