Home हिंदी Digital Media | रविवारी रात्री होणार न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा

Digital Media | रविवारी रात्री होणार न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा

617

नागपूर ब्यूरो : भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहे.

Advt.

केंद्र शासनाच्या या नवीन कायद्यानुसार न्यूजपोर्टल आणि डिजिटल मीडियाची भविष्यातील दिशा यावर चर्चा करण्यासाठी रविवारी रात्री 8 वाजता न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे विधिज्ञ डॉ. कल्याणकुमार मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. हा गूगल वेबिनार सर्व डिजिटल वृत्त माध्यमांसाठी व संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त राहील. तसेच निमंत्रित मान्यवर देखील सहभागी होत आहेत. या वेबिनारचे आयोजक वेबसाईट निर्मिती क्षेत्रातील काव्यशिल्प डिजिटल मीडिया आहे.

डॉ. कल्याण कुमार यांचा परिचय

डॉ. कल्याण कुमार हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि अमेरिकेच्या येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे जन्मलेल्या डॉ. कल्याण यांचे शिक्षण मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली व महाराष्ट्र या चार प्रमुख राज्यांसह अमेरिकेत झाले आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात “लेबर हिस्ट्री” या विषयात पी.एचडी. पूर्ण केली. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. ते नागपूर उच्च न्यायालयात मानवाधिकार, कामगार आणि डिजिटल मीडिया कायद्याचे अभ्यासक आहेत. कामगार आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात याचिकांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करीत असतात.

Previous articleUPSC Topper | 4 बार असफल हुए, पर हिम्मत नहीं हारी; सेल्फ स्टडी के साथ कोचिंग ली और क्लीयर कर लिया यूपीएससी
Next articleMann Ki Baat | पीएम मोदी बोले- ‘स्वच्छता आंदोलन हमारी आदतों को बदलने का अभियान बना’
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).