Home Maharashtra Meeting on Naxalism । अमित शहा यांच्या सोबत बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Meeting on Naxalism । अमित शहा यांच्या सोबत बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

544

मुंबई ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शासकीय निवासस्थान वर्षाहून ते दिल्लीला जाण्यासाठी भल्या सकाळीच रवाना झाले आहेत. दिल्लीत सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री बैठकीनंतर दुपारी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित असतील. बैठकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालेल.

राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत गृहमंत्र्यांना माहिती देणार

नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.

Previous articleWardha News । केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत : नाना पटोले
Next articleबावनकुळे आक्रमक । सर्वोच्च न्यायालयात जाऊन ओबीसी आरक्षण अध्यादेश टिकवा आणि निवडणुका थांबवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).